>> निनाद पाटील
आजही मी माझी पाटी कोरी ठेवून दररोज आयुष्याकडून नवनवीन गोष्टी शिकत राहते. एक कलावंत आणि मुख्य म्हणजे एक माणूस म्हणून स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करत राहते… सांगताहेत अभिनेत्री मृणाल देशपांडे.
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अगणित माणसे भेटत राहतात. प्रत्येकाकडून आपण काही ना काही तरी शिकत असतो, टिपत असतो. रक्ताच्या माणसांकडून आपण शिकतोच, पण नात्यागोत्याच्या नसलेल्या व्यक्तींकडूनही आपल्याला काही ना काही तरी शिकायला मिळते. मला आठवते स्ट्रगलिंगच्या काळामध्ये मी आमणि मिताली जगताप दोघी जणी मानसी यांच्या घरी भाडय़ाने राहायचो. हॉलमध्ये झोपायचो. एका छोटय़ा कपाटात आमचे सामान आम्ही काsंबून ङ्खेवायचो. वेळप्रसंगी एक पोळीसुद्धा अर्धी अर्धी वाटून खाल्ली आहे. दहा रुपयांचे थेपल्याचे पाकीट घेऊन दोघींमध्ये वाटून घ्यायचे, पण जे आहे ते अर्धे अर्धे वाटून घ्यायचे, प्रेमाने खायचो. कधी कधी तर खूपच चणचण व्हायची, पण आम्ही त्यातूनही मार्ग काढायचो. स्ट्रगल करायची, हार मानायची नाही, जिद्दीने पुढे आपल्या ध्येयाकडे सरकत राहायचे हे सार त्या दिवसांनी शिकवले.
माझ्या पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीचा जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘पुढचं पाऊल’ या मालिकेचे नाव ओङ्गांवरती येते. ही मालिका म्हणजे मैलाचा दगड. जवळपास दोन हजार भाग पूर्ण केले. त्यामध्ये मी साकारलेली ‘देवकी काकू’ ही भूमिका माझी जिव्हाळय़ाची. मनाच्या अगदी जवळची. मुळात मी जशी आहे त्याच्या अगदी विरुद्ध असलेली ही भूमिका. शांत, सोज्ज्वळ, लाघवी, नम्र अशी व्यक्ती जी मी बिलकूल नाहीये. सुरुवातीला ती भूमिका साकारताना मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आणि नंतर नंतर हळूहळू ती भूमिका माझ्यामध्ये मुरत गेली, रुतत गेली, खोलवर झिरपत गेली. जवळ जवळ सहा-सवासहा वर्षे ती भूमिका मी जगले. माझ्या स्वभावात लक्षणीय बदल झाले. शांतपणे, समंजसपणे परिस्थिती हाताळता यायला लागली. प्रत्येक येणारा दिवस, प्रत्येक सीन एक नवे आव्हान म्हणून स्वीकारायला शिकवले. प्रत्येक सीन अवॉर्ड विनिंग झालाच पाहिजे हे मनावरती बिंबवून पॅमेऱयासमोर उभी राहिले. स्वतःचा सीन असो किंवा नसो. सहकलाकारांचा अभिनय पाहून त्यातून जे घेता येईल ते टिपून घ्यायला लागले. इतकी मी त्या व्यक्तिरेखेशी एकरूप झाले होते. हे व असे अनेक बदल स्वभावात घडले आणि एक महत्त्वाचे म्हणजे आमची टीम. हर्षदा, प्रदीप वेलणकर, सुयश, संग्राम आणि बाकी सारे अगदी एका कुटुंबासारखे तिथे राहिलो. बारा-बारा तास एकत्र काम करून एक मस्त बॉण्डिंग जमले. शब्दांत न मांडता येणारे. हर्षदा खानविलकरसारखी जिवाभावाची मैत्रीण मिळाली. आपल्या सहकलाकारांना, आपल्या ज्युनिअर्सना अगदी आईच्या मायेने कसे सांभाळावे आणि एकमेकांच्या हातात हात घालून आपले काम एकत्रितपणे अधिकाधिक उत्तम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हर्षदा खानविलकर. शिल्पा नवलकर, अनिल देशमुख यांचे जिवाभावाचे मैत्र मला एक ना अनेक असंख्य गोष्टी शिकवून गेले. नाव तरी कुणाकुणाची घेऊ?
आज मी जी काही आहे त्याचे सर्वाधिक श्रेय माझा नवरा चंद्रकांत याला जाते. ज्या ज्या क्षणी त्याची गरज असते त्या त्या क्षणी तो पहाडासारखा पाङ्गी उभा असतो. मला प्रोत्साहित करत असतो. तू पुढे जा मृणाल, मी आहे सोबत हे बोलणारी त्याची आश्वासक नजर माझ्या पंखात अधिक बळ देऊन जाते.