मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. प्रसिद्ध मराठी गाणे ‘बघतोय रिक्षावाला’ याच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही महिन्यातच तिचा पूर्वाश्रमीचा नवरा प्रदीप खरेरा याने नुकताच साखरपुडाही केला. त्यानंतर मानसी पुन्हा एकदा चर्चेत आली ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. मानसीने ब्लॅक आऊटफिटमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे. यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून आऊटफिटवर शोभेल असा लाईट मेकअप केला आहे. सोबतच मोकळ्या ओल्या केसांनी मानसीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतल आहे. मानसीने हे बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करताना Give the World a reason to REMEMBER your name असं कॅप्शनही दिले आहे. मानसीचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.