अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तो दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. शशांक आणि प्रियांकाच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
शंशांकने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती.पत्नीसोबतचे खास मॅटर्निटी फोटोशूट करत ही बातमी दिली होती. शिवाय ‘2025 चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई-बाबा पुन्हा एकदा आजी-आजोबा व्हायला तयार झालो आहोत’, अशा शब्दांत शशांकने आनंद व्यक्त केला होता. दरम्यान आता शशांक आणि प्रियांकाला एक गोड मुलगी झाली असून ‘आता खऱ्या अर्थानं कुटुंब पूर्ण झालं. घरात लक्ष्मी आली. राधा ‘असा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
शशांकने 4 डिसेंबर 2017 रोजी प्रियांका ढवळेशी लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांनंतर प्रियांकाने मुलाला जन्म दिला. शशांक आणि प्रियांकाच्या मुलाचे नाव ऋग्वेद आहे. आता शंशाकला दुसरी गोड मुलगी झाली आहे. त्याने मुलीचे नाव ‘राधा’ ठेवले आहे. इन्स्टाग्रामवर त्याने मुलीचे नाव जाहीर केले आहे.
.