राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळातील कार्याने प्रभावित होऊन व राज्याचा विकास करण्याच्या दृष्टीने मराठा संग्राम पक्षाने एका पत्राद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.