Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बार्शीच्या तरुणानं संपविलं जीवन, चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि सगेसायरेची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले असतानाच आता हा मुद्दा आणखीन तापला आहे. एकीकडे आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या तरुणांचे आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव आहे. आता बार्शी येथील तरुणाने चिठ्ठी लिहून जीवन संपवले आहे.

पुण्यामध्ये एका खासगी कंपनीत काम करणारा बार्शीतील तरुण शंभुभक्त प्रसाद देठे यांने मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. देठे याच्या आत्महत्येमुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे.

फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख प्रसाद देठे याने चिठ्ठीत केला आहे. देठे याच्यामागे पत्नी, 2 मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

13 जुलैच्या आत ओबीसीत आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची मागणी

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

जयोस्तु मराठा,

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.

मला माफ करा.

तुमचाच प्रसाद