उच्च न्यायालयाने उपचार घेण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या सन्मानासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी नवव्या दिवशी पाणी घेऊन उपोषण स्थगित केले. मराठा आरक्षणात खोडा घालणारांना धडा शिकवण्याचे आवाहनही यावेळी मनोज जरांगे यांनी केले. दरम्यान, उपोषण स्थगित झाल्यानंतर जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या पाऊस चालू आहे. आंतरवालीत येण्यासाठी रस्ता नाही. लोक चिखलात उभे राहतात. ही परवड पाहवत नाही. पण आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाज एकत्र आला. आता ही एकी अशीच राहू द्या, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठय़ांच्या कल्याणाच्या आड येऊ नये, असा इशाराही जरांगे यांनी दिला.