सरकार मराठ्यांना जाणूनबुजून त्रास देतंय

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठ्यांना मदत करणं सरकारने थांबवलंय, फडणवीसांनी ही मदत रोखली आहे, तातडीनं ही मदत वाटप सुरू करावी; अन्यथा राज्यात पुन्हा मोठं आंदोलन उभं करीन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

सरकार गोरगरीब मराठ्यांना जाणूनबुजून त्रास देत आहे. त्यामुळे हा त्रास मी सहन करू शकत नाही. हा त्रास असाच सुरू राहिल्यास राज्यात आणखी मोठं आंदोलन उभं करीन, असा इशाराही जरांगे यांनी दिला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले असते तर मराठ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या नसत्या. त्यांच्या कुटुंबांची मदत थांबवून पैसे रोखून धरणे हे काही मर्दानगीचे काम नाही. त्या कुटुंबांना लवकर मदत नाही केली तर राज्यभरात कडक आंदोलन हाती घेतल्यास तुमचे खूप हाल होतील, असा इशाराही मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी दिला.