हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे मुंबईत ठिकठिकाणी रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
– शिवसेना शाखा क्रमांक 2 च्या वतीने बुधवारी विभागातील पालिकेचे सफाई कर्मचारी, परिचारिका, खासगी रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक शर्मिला पाटील, विधानसभा समन्वयक रोशनी कोरे-गायकवाड, शाखा संघटक मानसी म्हातले, युवती शाखा अधिकारी आर्जवी मांजरेकर, युवती शाखा समन्वयक समीक्षा म्हातले, डॉ. बिनिथा पंधारीया उपस्थित होते.
– शिवसेना, युवासेना शाखा क्र. 25 आणि 26 तसेच माजी नगरसेविका माधुरी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नागरिकांसाठी शासकीय योजनांचे शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस व विभागप्रमुख उदेश पाटेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपविभागप्रमुख योगेश भोईर, विधानसभा प्रमुख अशोक म्हामुणकर, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे, विधानसभा संघटक चित्तरंजन देवकर, विधानसभा समन्वयक रियाझ मुलानी, स्वरूपा प्रभू उपस्थित होते.
– परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ आणि शिवराज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक आनंद गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पोयबावडी शाळेतील गतिमंद मुलांना शालेय साहित्य, फळ व खाऊवाटप शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिन पडवळ, उर्मिला पांचाळ, पराग चव्हाण, मुकेश कोळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नाना फाटक, प्रभाकर मोरजकर यांनी केले.