
सध्या देशभरातील प्रमुख शहरांमध्ये अॅपवरून गाडी बुक करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासात आपण अनेकदा मौल्यवान सामान विसरतो. यातील सगळय़ाच वस्तू परत मिळतातच असे नाही. उबर या कॅब सर्व्हिस कंपनीने लॉस्ट अॅण्ड फाऊंड 2024 यादी नुकतीच जारी केली. यादीनुसार मुंबई हे शहर सर्वाधिक विसराळू शहर ठरलंय. म्हणजे उबर पॅबमध्ये वस्तू विसरण्यात मुंबईकर आघाडीवर असल्याचे दिसून आलंय. मोबाईल पह्न, वॉलेट हे तर नेहमीचेच, पण लग्नाच्या साडय़ांपासून सोन्याच्या बिस्किटांपर्यंत अनेक वस्तू उबर पॅबमध्ये प्रवासी विसरले. उबर कॅबमध्ये वस्तू विसरण्यात मुंबईकर पहिल्या क्रमांकावर, दुसऱया क्रमांकावर दिल्ली, पुणे तिसऱया क्रमांकावर आहे. हैदराबाद शहराचा नंबर खूप खाली आहे. याचाच अर्थ हैदराबादचे प्रवासी आपल्या वस्तूंची अधिक काळजी घेत प्रवास करतात.
– उबरमध्ये मोबाईल फोन, वॉलेट, इयरफोन, सनग्लासेस या नेहमीच्या वस्तू सापडल्या आहेतच, पण यासोबत लग्नाच्या साडय़ा, सोन्याचं बिस्कीट, 25 किलो गाईचं तूप, कूकिंग स्टोव्ह, हवन पुंड, बासरी, केसाचा विग, टेलिस्कोप अशा वस्तूही सापडल्या आहेत.
शनिवारी प्रमाण जास्त
लॉस्ट अॅण्ड फाऊंड यादीवरून असं दिसतंय की, शनिवारी वस्तू विसरण्याचे प्रमाण जास्त आहे. तेही संध्याकाळी 7 च्या आसपास. उबर प्रवासी लाल रंगातील वस्तू अधिक विसरलेले दिसून आले.