दिल्लीत कडाक्याच्या थंडीसह धुक्याचा कहर दिसून येतोय. शुक्रवारी सकाळी चहूबाजूला धुकंच धुकं होतं. त्यामुळे काहीच दिसेनासं झालं. जणू काही दिल्लीत सर्व काही गायब झालं. 10 मीटर अंतरापर्यंत काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे रस्त्यावर वाहने रेंगाळत होती. गाडय़ांना पार्किंग लाईट सुरू वरून वाट काढावी लागत होती. दाट धुक्यामुळे ट्रेन, विमानांच्या उड्डाणाला ब्रेक लागला. 26 ट्रेन आणि 150 विमानांना विलंब झाला. दिल्लीसह उत्तरेकडील अनेक भागांत कडाक्याची थंडी आहे. शुक्रवारी सकाळी दाट धुक्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.