बिहारच्या भागलपूरची रहिवासी असलेली मानवी कश्यप ही देशातील पहिली ट्रान्सजेंडर महिला पोलीस निरीक्षक बनली आहे. बिहार पोलीस सेवा आयोगाने नुकताच पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. या निकालामध्ये तीन ट्रान्सजेंडर्सचा समावेश करण्यात आला आहे. तीन ट्रान्सजेंडर्सची पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याआधी केरळमध्ये ट्रान्सजेंडरला सरकारी सेवेत हवालदार म्हणून नियुक्त केले होते. मी ट्रान्सजेंडर असल्याने माझ्या घरातील सदस्यांना वाईट गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे मी घर सोडून पळून गेले. मानवीने बीए ऑनर्सचे शिक्षण घेतले आहे. मानवी पाटण्यात पोहोचली. शिकवणीसाठी तिने अनेक इन्स्टिटय़ूटचे दरवाजे ओलांडले. परंतु, तिला शिकवण्यास सर्वांनी नकार दिला. ट्रान्सजेंडर्सचे आयुष्य खूप अवघड आहे, असेही मानवी म्हणाली.