मानपाडावासीयांनी रोखले ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम; निसर्गाने नटलेल्या भागाचे वाळवंट, धूळधाणीमुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले

ठाणे-बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामामुळे मानपाडा परिसराची धूळधाण उडाली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भागाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाले असून परिसरात श्वसनाच्या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ध्वनिप्रदूषण आणि वाहतूककोंडीमुळे हैराण झालेल्या मानपाडावासीयांच्या संतापाचा भडका आज अखेर उडाला. या प्रकल्पाविरोधात शेकडो नागरिकांनी रस्ता रोको करून काम बंद पाडले. त्यामुळे एमएमआरडीए प्रशासन आणि पोलिसांची एकच तारांबळ उडाली. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.

ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर 15 मिनिटांवर आणण्यासाठी एमएमआरडीएकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग बोगद्यातून जात असला तरी एमएमआरडीएने या मार्गासाठी या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली आहे. जुने वृक्ष रातोरात हटवले आहेत. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मानपाडालगत असलेला मुल्लाबाग हा परिसर निसर्गसौंदयनि नटलेला आहे. एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठी जुनी झाडे आहेत. त्यामुळे या भागातील वातावरण नेहमी थंड असते. हे निसर्गसौंदर्य पाहून अनेकांनी या भागात घरे घेतली आहेत. मात्र आता एमएमआरडीएने ठाणे-बोरिवली बोगद्याचे काम सुरू केल्याने मुल्लाबागच्या निसर्गसौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. त्याविरोधात आज शेकडो नागरिकांनी मुल्लाबाग येथे रस्ता रोको करून प्रकल्पाचे काम बंद पाडले.

प्रकल्पाला आमचा विरोध नाही

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग येथे संपणार आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी आमची मागणी असल्याचे स्थानिक नागरिक पंकज ताम्हाणे, डॉ. लतिका भानुशाली आणि नितीन सिंग यांनी केली. एमएमआरडीए प्रशासन हा बोगदा मुल्लाबाग येथे संपवणार आहे. मात्र बोगदा तिथे न संपवता थेट युनी अपेक्सपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. जर एमएमआरडीए प्रशासन आपल्या मनमानीवर कायम राहिले तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

ठिकाणी परद्वार मातीची वाहतूक केली जात आहे. दररोज शेकडो डंपर या भागात ये-जा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून नागरिकांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे.

मातीची वाहतूक करताना 2 डंपरचालकांकडून गाईडलाईनचे पालन केले जात नाही. त्यामुळे या भागात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. नागरिकांचे डोळे धुळीने भरत आहेत.

या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जुन्या वृक्षांची कत्तल केली आहे. प्रकल्पाच्या आड येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण संकुलाच्या आवारात करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र तिला प्रतिसाद मिळाला नाही