महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत उमेदवार लढवायचे की पाडायचे याचा निर्णय घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी जिथे निवडून येतील, तिथे आपले उमेदवार उभे करूया, असे म्हणत विधानसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले.
जिथे निवडून येतील, तिथे उमेदवार उभे करा. जिथे एससी, एसटीसाठी राखीव जागा असेल तिथे कोणत्याही पक्षाचा उमेदवार असला तरी उमेदवार देऊ नये. जिथे आपण उमेदवार देणार नाही जो उमेदवार 500 रुपयांच्या बॉण्डवर आपल्या मागणीला समर्थन आहे असे लिहून देईल त्याला मतदान करावे. तसेच मतांचे समीकरण न जमल्यास अर्ज मागे घ्यायचे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका
फडणवीस जगातील सर्वात क्रूर माणूस
ही वेळ आपल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आणली. फडणवीस हवालदार असून आपल्याला सत्ता परिवर्तन करायचे आहे, धर्मपरिवर्तन नाही. मी शिवरायांचे हिंदुत्व मानतो. कुणाचे ऐकून कुणाशी भांडू नका. इंग्रज बाहेरुन आले होते. फडणवीस इथलेच आहेत. ते जगातील सर्वात क्रूर माणूस आहेत, असे हल्लाबोल जरांगे पाटील यांनी केला.