मनोज जरांगे यांचे आजपासून पुन्हा उपोषण

दोन वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरसकट कुणबीतून आरक्षण द्या. गॅझेट लागू करा, शिंदे समितीचे काम सुरू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, या मागण्यांसाठी शनिवार 25 जानेवारीपासून आंतरवाली सराटी येथे आठव्यांदा बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली.

ते म्हणाले की, या आंदोलनात आता शिंदे समिती नोंदी का शोधत नाही, व्हॅलिडिटी का देत नाही हे कळेल. मराठय़ांनी भरभरून सरकारला मते दिली आहेत. मुख्यमंत्री आमच्याशी दगाफटका करणार नाहीत. उद्या 25 रोजी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान उपोषण सुरू करणार. मराठय़ांशी गद्दारी, बेइमानी केली तर कुणालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.