देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचे वाटोळे केले आहे आणि त्यांच्या इतके कोणीच नाही केले. मी एकदा वाटोळे करणाऱ्याच्या मागे लागलो की वाटोळेच करतो. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा संपूर्ण संपवायचा ठरवले आहे. फडणीस यांना सरकारमध्ये आणि भाजपमध्ये मराठ्यांचे लोक नको आहेत, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली.
आजपासून आमच्या पुढील आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. कोणी येऊ द्या, आम्ही उभे आहोत. मस्तीत यायचे नाही, गुरमीत वागायचे नाही. हा मराठा तुम्हाला लढून गुडघ्यावर टेकवणारा होणार आहे. मराठ्यांना हरवण्याची ताकद कोणातही नाही. तुमचा गेम करणार आहोत. पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. मी तर आमरण उपोषणाची तयारी केली आहे. आम्ही सामूहिक उपोषण करणार आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी आज केली.
मी लोकसभेला कुणाचे नाव घेतले नाही आणि आताही नाही घेतले. मी सांगितले आहे तुम्हाला ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचे त्यांना निवडून आणा. शेवटी सन्मान हा समाजाच्या हातात आहे. कोणाला मतदान करायचे किंवा नाही करायचे, त्यामुळे समाजही अडचणीत आला नाही पाहिजे असे जरांगे म्हणाले.
नितेश राणे उंदराच्या तोंडाचा
मराठा समाज जेवढा शांत आहे तेवढाच बेक्कार पण आहे. आम्हाला कोणीही खुन्नस देऊ नये. नितेश राणे हा उंदराच्या तोंडाचा आहे. नितेश राणे यांनी माजल्यावाणी बोलू नये, नीट राहावे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. नीलेश राणे यांनी नितेश राणे यांना समजून सांगावे, नसता मला जशास तसे उत्तर द्यावे लागेल. माझा नाइलाज होईल.