माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पंचत्वात विलीन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पण अंत्यसंस्कारावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार सरकारने मनमोहन सिंग यांचा अपमान केला, असा आरोप विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री यावेळी उपस्थित होते. त्यासोबतच लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमधील प्रमुख नेते आणि इतर पक्षातील प्रमुख नेतेही यावेळी उपस्थित होते.
भारत माता के महान सपूत और सिख समुदाय के पहले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंह जी का अंतिम संस्कार आज निगमबोध घाट पर करवाकर वर्तमान सरकार द्वारा उनका सरासर अपमान किया गया है।
एक दशक के लिए वह भारत के प्रधानमंत्री रहे, उनके दौर में देश आर्थिक महाशक्ति बना और उनकी नीतियां आज भी देश के…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2024
मनमोहन सिंग यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कारानंतर झाले ती जागा आणि त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसने मोठे आरोप केले आहेत. या मुद्द्यावर आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अंत्यसंस्कारावरून केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
हिंदुस्थानचे महान सुपुत्र आणि शिख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने त्यांचा अपमान केला आहे. एक दशक ते हिंदुस्थानचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महाशक्ती बनला आणि त्यांची धोरणं आजही देशाच्या गरीब आणि मागासवर्गीयांचा सहारा आहेत. आजपर्यंत सर्व माजी पंतप्रधानांचा सन्मान करत त्यांच्यावर अधिकृत स्मारकाच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वोच्च सन्मान आणि स्मारक स्थळासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना हक्क आहे. देशाचे महान पुत्र आणि त्यांच्या गौरवशाली समुदायाचा सरकारने आदर केला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.