‘मी माझा मार्गदर्शक गमावला’, राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील राजकीय नेते त्यांचे स्मरण करत श्रद्धांजली वाहत आहेत. यातच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंह यांची आठवण काढत त्यांचे गुरू म्हणून वर्णन केले आणि मी माझा मार्गदर्शक गमावला असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले आहेत की, ”मनमोहन सिंग यांनी अफाट बुद्धिमत्ता आणि निष्ठेने भारताचे नेतृत्व केले. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यापैकी लाखो लोक जे त्यांचे
चाहते होते ते त्यांना अभिमानाने स्मरणात ठेवतील.”