ManMohan Singh – डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अत्यंसंस्कार

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि आर्थिक सुधारणांचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींसह काँग्रेसचे सर्व बडे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंत्यसंस्कारासाठी राजघाटावर जागा नाकारली

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारने राजघाटावर जागा नाकारली. दिल्लीच्या निघमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने संरक्षण विभागाला दिले आहेत. त्याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यांच्या पदानुसार त्यांचा सन्मान राखायला हवा. त्यांचे अंत्यसंस्कार आणि स्मारक यमुना नदीकिनारी राजघाटावरच व्हायला हवे, अशी मागणी काँग्रेसने केंद्राकडे केली आहे. यापूर्वीच्या दिवंगत पंतप्रधानांची स्मारकेही राजघाटावर आहेत.