मणिपूरच्या उखरूल जिह्यात आज पुन्हा हिंसाचार उफाळला. नागा समाजाच्या दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात तिघांचा मृत्यू झाला तर 10 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागा समाजाच्या दोन गटांनी हुनफुन आणि हंगपुंग या दोन वेगवेगळ्या गावांतील जमिनीवर दावा केला आहे. स्वच्छता अभियानांतर्गत संबंधित वादग्रस्त जमिनीवरील स्वच्छता मोहिमेवरून दोन्ही गटांमध्ये हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर या परिसरात आसाम रायफल्सच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.
थौबल जिल्ह्यात तणाव
थौबल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन तरुणांचे अपहरण केल्याच्या निषेधार्थ 48 तासांचा बंद पुकारला. यामुळे येथे प्रचंड तणाव होता. दहशतवाद्यांनी 27 सप्टेंबर रोजी संबंधित दोन तरुणांचे अपहरण केले होते. 30 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत तरुणांची सुटका न केल्यास जिल्ह्यात निदर्शने आणि संपूर्ण बंदचा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेसचे अमित शहा यांना पत्र
अपहरण करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांच्या सुरक्षेची हमी द्या. तसेच त्यांची लवकरात लवकर सुटका होईल त्याअनुषंगाने ठोस पावले उचला अशी मागणी करणारे पत्र इनर मणिपूरचे खासदार बिमोल अकोईजम यांनी पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. अपहरण झालेल्या तरुणांचे पुटुंब अतिशय तणावाखाली आहे. 2 मे 2023 पासून मणिपूरमध्ये टोकाचा हिंसाचार सुरू आहे. मैतेई आणि पुकी समाजातील शेकडो लोक या हिंसाचारात मारले गेले, याकडेही अकोईजम यांनी शहा यांचे लक्ष वेधले आहे.