मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, राजभवनावर व सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक

मणिपूरमध्ये राज्यपाल व पोलीस महासंचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून सोमवारी त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राजभवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांनी पहिला सीआरपीएफच्या ताफ्यावर व नंतर राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

राज्यातील वाढत्या हिंसाचार व ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था यामुळे राज्यातील विद्यार्थी 8 सप्टेंबरपासून रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी राज्यपाल, राज्याचे पोलीस महासंचालक व काही आमदार जबाबदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हे आंदोलन करत आहेत.

रविवारी आंदोलक किशमपत येथील तिद्दीम रोडवर आंदोलन करत होते. सोमवारी त्यांनी त्यांचा मोर्चा राजभवनाकडे वळवला. यावेळी त्यांना रोखण्यासाठी आलेल्या सीआरपीएफच्या गाडीवर देखील विद्यार्थ्यांनी बाटल्या व दगडफेकले.