Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी

मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात हमार आणि झोमी समुदायांमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. बुधवारी झालेल्या हिंसाचारात 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. लालरोपुई पाखुमाते असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हमार समुदायाच्या सदस्यांनी 18 मार्च रोजी झोमी गटाच्या समुदायाचा ध्वज फडकवण्यास विरोध केल्यानंतर हा हिंसाचार उसळला.

झेनहांगमध्ये 16 मार्च रोजी हमार नेत्यावर हल्ला झाल्यानंतर संघर्षास सुरूवात झाली. यानंतर जिल्ह्यात आधीच कर्फ्यू लावण्यात आला होता. मंगळवारी हमार इनपुई मणिपूर आणि झोमी कौन्सिलने शांतता करारावर स्वाक्षरी करूनही तणाव कायम होता.

हिंसाचारानंतर झोमी स्टुडंट्स फेडरेशनने बुधवारी अनिश्चित काळासाठी बंद जाहीर केला. पोलीस उपयुक्त धरुन कुमार एस यांनी जनतेला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी चुराचंदपूर शहरात आणि आसपास ध्वज मार्च काढण्यात आले.