वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याने मणिपूर भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षांचे घर जाळले; जमावाने व्यक्त केला संताप

वक्फ सुधारणा विधेयकावरून देशातील वातावरण तापले आहे. काँग्रेससह काही पक्षांनी या विधेयकाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे. मणुपूरमध्येही या विधेयकाचे पडसाद उमटले आहेत. या विधेयकाला पाठिंबा दिल्याने मणिपूर भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अस्कर अली मक्कामय्यूम यांचे घर जमावने जाळत त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर, अस्कर अली यांनी माफी मागितली आणि सरकारला नवीन कायदा रद्द करण्याची विनंती केली.

मुस्लिम समुदायातील असल्याचा संशय असलेल्या एका जमावाने रविवारी मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील राज्य भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अस्कर अली मक्कामय्युम यांच्या निवासस्थानी तोडफोड केली आणि त्यांच्या घराला आग लावली. त्यांनी नुकतेच मंजूर झालेले वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 ला पाठिंबा दिला. या घटनेनंतर, अस्कर अली यांनी माफी मागितली आणि केंद्र सरकारला नवीन कायदा मागे घेण्याचे आवाहन केले.

फेसबुक पोस्टमध्ये, अस्कर अली यांनी लोकांना वक्फ विधेयकावर राजकारण करू नये असे आवाहन केले. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संमतीनंतर कायदा आहे. त्यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना टॅग केले. वक्फ दुरुस्ती विधेयकावर राजकारण करू नका. आम्ही विधेयकाचे स्वागत करतो. आम्ही WAB ला पाठिंबा देतो, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

थौबल जिल्ह्यातील लिलोंग हाओरेबी संब्रुखोंग येथील अस्कर अलीच्या निवासस्थानी एक जमाव पोहोचला. जमावाने त्यांच्या घराची तोडफोड करत घराला आग लावली. अस्कर अली यांनी वक्फ विधेयकाचे समर्थन केले होते आणि त्याविरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांविरुद्ध टीका केली होती. त्यामुळे जमाव संतप्त झाला होता. या घटनेनंतर अस्कर अली यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल माफी मागितली आणि सरकारला वक्फ कायदा रद्द करण्याचे आवाहन केले.

लोकसभा आणि राज्यसभेत अलिकडेच मंजूर झालेल्या वक्फ विधेयकासंदर्भात, मी सोशल मीडियावर विधेयकाचे समर्थन करणाऱ्या काही पोस्ट शेअर केल्या होत्या. मी संपूर्ण मुस्लिम समुदायाची आणि मेईतेई पांगळांची माफी मागतो. आता मी सरकारला कायद्यात रूपांतरित झालेले विधेयक लवकरात लवकर रद्द करण्याची विनंती करतो, असे ते म्हणाले.