मणिपूर सरकारने नऊ जिह्यांमधील मोबाईल इंटरनेटवरील बंदी 5 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, काकचिंग, बिष्णुपूर, थौबल, चुराचंदपूर, कांगपोकपी, फेरझॉल आणि जिरीबाममध्ये येत्या गुरुवारी संध्याकाळी 5.15 वाजेपर्यंत इंटरनेट बंद असेल, असे गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून मणिपूर धुमसतेय. जिरीबाम आणि बराक नद्यांमध्ये तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला. त्यामुळे
16 नोव्हेंबरपासून इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती.