
शासकीय कोट्यातील सदनिकेचा लाभ घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला अपिलाचा निकाल लागेपर्यंत आज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील शासकीय सदनिकेचा 1995 मध्ये लाभ घेतला आहे. या वेळी त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता, त्या खटल्याचा निकाल 20 फेब्रुवारी रोजी लागला. कोकाटे बंधूंना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याविरुद्ध कोकाटे यांनी अपिल केले आहे.