मंत्र्यांचे पीएस, ओएसडी स्वत: फडणवीस ठरवतात, माणिकराव कोकाटे यांचे विधान

विधानसभा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दम दिला. माझ्यासह आता तुमच्या कुणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल, असे ते म्हणाल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज सांगितले. आमचे पीएस आणि ओएसडीसुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्याही हातात काही राहिलं नाही, अशी हतबलता यावेळी कोकाटे यांनी व्यक्त केली. त्यावर फडणवीसांनी खडे बोल सुनावले.