मंडपेश्वरची राज्य मानांकन स्पर्धा

बोरीवली पूर्वेच्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्या (एमसीएफ) दहाव्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे येत्या 18 ते 20 एप्रिलदरम्यान प्रेमनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना 1 लाख 10 हजारांची रोख बक्षिसे व चषक आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज संलग्न जिह्यांमार्फत 8 एप्रिल 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार असून स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9987045429 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.