
पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आग्य्रात उघडकीस आली आहे. मानव शर्मा असे त्याचे नाव आहे. तो पंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ बनवला असून यात ‘आई-बाबा मला माफ करा. मी माझ्या बायकोच्या सततच्या जाचाला पंटाळलो आहे. ती सतत मला धमकी देत असते. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकटे पडत आहेत,’ असे या व्हिडीओतून सांगितले आहे.