12 वर्षीय मनस्वीचे 1800 फूट खोल रॅपलिंग

कल्याणच्या 12 वर्षीय ट्रेकर मनस्वी बांडे हिने हरिश्चंद्रगडावरील 1800 फूट खोल महाकाय कोकणकडा उतरण्याचा (रॅपलिंग) पराक्रम केला आहे. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा समजला जातो. मनस्वीने आतापर्यंत विविध गडकिल्ल्यांसह 172 गिरीशिखरांवर गिर्यारोहण केलेय. मनस्वीच्या या साहसाबद्दल तिच्यावर चोहोबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होतोय.