महाकुंभ मेळ्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून अटक केली आहे. या तरुणाने नासिर पठाण या नावाने फेक सोशल मीडिया प्रोफाईल बनवून ही धमकी दिली होती. मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याचं खरं नाव समजलं त्यांना धक्काच बसला. या तरुणाचं खरं नाव आयुष कुमार जयस्वाल आहे.
आयुष कुमार हा पूर्णिया जिल्ह्यातील भवानीपूरातील शहीदगंज भागात आपल्या कुटुंबासोबत राहतो. आयुषने सोशल मीडियावर नासिर पठान नावाने एक फेक प्रोफाइल तयार केले होते. याच प्रोफाइल मार्फत त्याने 31 डिसेंबरला महाकुंभ मेळ्यात बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर पोलिसांना तपास सुरू केला व आयुष कुमारला अटक केली.
यावर्षी कुंभमेळा हा 13 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान कुंभमेळा होणार आहे. मेळयाला देशविदेशातून 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. रेल्वेची 560 पेक्षा जास्त तिकीट काऊंटर असून त्यावर दररोज 10 लाख तिकीटांचे बुकींग होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेय.