
हुंड्यासाठी पत्नीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमर पाटील असे माथेफिरू पतीचे नाव असून त्याने सुरुवातीला पत्नी प्रज्ञा पाटील हिचा मानसिक व शारीरिक छळ केला. मात्र वारंवार होणाऱ्या जाचाला संतापून पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता अमरने तिच्या डोक्याला पिस्तूल लावून घर सोडून निघून जाण्याची धमकी दिली.
अमर पाटील हा हॉटेल व ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याचे प्रज्ञासोबत 2013 मध्ये लग्न झाले. लग्नावेळी अमरच्या कुटुंबीयांनी प्रज्ञाच्या वडिलांमधून एक किलो सोने, सोन्याचे दागिने व 50 लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे प्रज्ञाच्या वडिलांनी लग्नात एक किलो सोन्याचे दागिने दिले. नंतर टप्प्याटप्प्याने अमरला 23 लाख रुपये दिले. दरम्यान उर्वरित हुंड्याची रक्कम देऊ शकले नाही म्हणून अमरने प्रज्ञाला शिवीगाळ, मारहाण व मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर प्रज्ञाने पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.