मुलाला गिळत होता महाकाय मासा; वडील बनवत व्हीडीओ आणि त्यानंतर पुढे भयंकर घडले

चीलीमधून एक अनोख्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका तरुणाला हम्पबॅक या व्हेल माशाने गिळले आणि काहीवेळाने बाहेरही ओकले.अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ त्याच्या वडिलांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही घटना चिलीतील पॅटागोनिया येथे घडली. एड्रियन सिमाकास असे तरुणाचे नाव असून तो आणि त्याचे वडिल बोट सफर करत होते. एड्रिसन ज्यावेळी बोटीतून सफर करत होता, त्यावेळी त्याचे वडिल दुसऱ्या बोटीतून त्याचा व्हिडीओ बनवत होते. दरम्यान बोटसफारीचा तरुण आनंद घेत असताना एक महाकाय हम्पबॅक व्हेल मासा तिथे आला आणि त्याने एड्रियन याला त्याच्या बोटीसह गिळले. वडील दुसऱ्या बोटीतून हा थरार पाहत होते, मात्र काही वेळाने माशाने उल्टी केली आणि एड्रियन त्याच्या बोटीसह बाहेर आला. एड्रियनचे वडील डेल काही मीटर अंतरावर होते. त्यांनी लगेच एड्रियनला आपल्याकडे ओढले.

ते प्रचंड घाबरलेल्या एड्रियनला शांत राहण्यास सांगत होते आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत होते. या घटनेनंतर एड्रियन म्हणाला – व्हेलने मला गिळून खाल्ले असेच वाटले. हा खूप भयंकर क्षण होता. मी मरण अनुभवले होते.  त्यावेळी मला वाटले की आता मी काहीही करू शकत नाही. मात्र जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला आणखी भीती वाटली कारण माझ्या वडिलांनाही काहीतरी होईल याची भिती वाटली.