कर्नाटकात तरुणाकडून पाकिस्तान झिंदाबादचे नारे, जमावाकडून तरुणाची हत्या

कर्नाटकात एका तरुणाने क्रिकेट मॅच दरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. तेव्हा जमावाने या तरुणाला जबर मारहाण केली, या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या मंगरुळूमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सचिन नावाच्या तरुणाने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. तेव्हा काही तरुण चिडले आणि त्यांनी सचिनला मारहाण केली आणि नंतर त्याला एका मंदिराजवळ सोडून दिले. सचिनला जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी केली. या प्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.