प्रेयसीला इनोव्हा कारमधून फिरायचे होते, म्हणून कानपूरमधील विद्यार्थ्याने चक्क एसबीआय बँकेवर दरोडा टाकायचा प्रयत्न केला. त्याने बँकेतील तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. अखेर बँक कर्मचारी आणि काही ग्राहकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्लेखोर लवीश मिश्रा तोंडाला मास्क लावून बँकेत शिरला. त्याने सुरक्षारक्षकावर चाकूने वार केला. हे पाहून पॅशियर आणि व्यवस्थापकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. काही वेळ त्यांच्यात झटापट सुरू होती. अखेर लवीश मिश्राला पकडण्यात बँक कर्मचाऱयांना यश आले.