शिकारीच्या बंदुकीतून गोळी झाडून एकाचा खून, जमिनीच्या वादातून घडला प्रकार

file photo

सातारा तालुक्यातील केळकली येथे जेसीबीकामात आडकाठी आणल्याच्या रागातून शिकारीच्या बंदुकीचे बार झाडून एकाचा खून करण्यात आला. रमेश धोंडीबा जांगळे (कय 25, रा. केळवली (बांबरवाडी, ता. सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परळी खोऱयात खळबळ उडाली आहे.

शंकर जानकर व चिमाजी जानकर (रा. केळकली, ता. सातारा) यांच्यावर या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रमेश व संशयितांमध्ये काही दिवसांपूर्वी जमीन सपाटीकरणावरून वाद झाला होता. याचा राग शंकर व चिमाजी यांना होता. रमेशचा कायमचा काटा काढायचा, या हेतूने चिमाजी याने मंगळवारी रात्री रमेश याला काम असल्याचे सांगून घराबाहेर बोलावून घेतले. संशयित रमेशला घेऊन अज्ञात ठिकाणी गेले. रमेशला नेल्यानंतर ग्रामस्थांना तासाभराने शिकारीच्या बंदुकीचा बार उडाल्याचा आकाज ऐकू आला होता. मात्र, कोणीतरी वन्यप्राण्याची शिकार केली असेल, या विचाराने कोणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र, बुधवारची सकाळ उजाडल्यानंतरही रमेशचा पत्ता नसल्याने त्याचा भाऊ बाबूराव जांगळे याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच रमेशच्या नातेवाईकांनीही त्याचा शोध घेतला; पण तो मिळून आला नव्हता.

शुक्रवारी सायंकाळी परळी-केळवली रस्त्यावरील नित्रळ हद्दीतील मोरीच्या सिमेंटच्या पाईपमध्ये रमेशचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर असणाऱया जखमा व गोळीबाराच्या खुणा आढळल्या. त्यामुळे त्याचा खून झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रमेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद होती. याची अधिक माहिती घेतली असता, रमेशचा भाऊ बाबूराव याने रमेशला चिमाजी याने बाहेर नेल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक किश्लेषणाच्या आधारे दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.