
प्रेमात लोक इतके आकंठ बुडतात की त्यांना आपल्या जोडीदाराविषयी सत्य परिस्थिती जाणून घ्यायची इच्छाही होत नाही. अनेकजण कोणत्याही स्थितीत आपल्या प्रेमाचा स्वीकार करतात. मात्र नंतर सत्य समजल्यावर त्यांना धक्का बसतो. अश्याच एका प्रेमकथेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. एका 26 वर्षीय़ तरूणाची प्रेमात फसवणूक झाली आहे. त्या तरूणाने याबाबतची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या त्याच्या आपबीतीवरून प्रेम आंधळं असतं, याचीच प्रचिती येते, असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
एक 26 वर्षीय तरूण गेल्या चार वर्षांपासून एका 27 वर्षीय़ तरूणीला डेट करत होता. मात्र या चार वर्षांच्या प्रेमाच्या या प्रवासात या तरूणाची फसवणूक झाल्यने त्याचा प्रेमावरचा विश्वासच उडाला. आपण चार वर्ष ज्या तरूणीसोबत प्रेमाची स्वप्न रंगवत होतो ती 27 वर्षीय नसून चक्क 48 वर्षांची महिला आहे, हे समजल्यावर तरूणाचा हिरमोड झाला. या तरूणाने Raddit या अॅपवर आपला अनुभव शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर लोकांनी त्याचे सांत्वन केले आहे.
मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत गेल्या चार वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे. सुरूवातीपासून तिने मला तिचा जन्म एप्रिल 1998 मध्ये झाला असल्याचे सांगितलं होतं. त्यामुळे ती माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षांनी मोठी होती. ती दिसायलाही खूप सुंदर आहे त्यामुळे तिचे वय कधीच दिसून आलं नाही. मला ती कधीच पन्नाशीतली महिला वाटली नाही. आमच्या या 4 वर्षांच्या प्रवासात मी माझ्या सगळ्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत हिची ओळख करून दिली होती, मात्र तिने कधीच मला तिच्या मित्रांची भेट करून दिली नाही. त्यामुळे मी थो़डा पेचात होतो. असे त्याने पोस्ट मध्ये म्हंटल आहे.
पुढे तो म्हणाला, मी अनेकदा तिला तिचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले होते. मात्र तिने नेहमीच मला नकार दिला. त्यामुळे मी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र मनात खूप गोष्टी सुरू होत्या. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या मला काय कराव हे कळत नव्हत. अशातच एक दिवस मला तिच्या लॅपटॉपमध्ये तिचा पासपोर्ट आढळला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण या पासपोर्टवर तिची जन्म तारीख 98 नसून 1977 होती. म्हणजेच तिचं वय 27 नसून 48 वर्ष होतं. हे सत्य समजल्यानंतर आता मला काय कराव हेचं सुचत नाहीए. Any Suggestions? अशी पोस्ट या तरूणाने शेअर केली आहे.
दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हाय़रल होत आहे. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच त्याला आपल्या खोटारड्या प्रेयसीसोबत न राहण्याचाही सल्ला दिला आहे.