उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतातील शियानमेन येथे राहणाऱ्या श्याओमा नावाच्या 23 वर्षीय मुलाला जवळपास एक महिन्यापासून सतत शिंका येणे, नाक बंद होणे आणि नाक वाहणे याचा त्रास होत होता. यासाठी त्यांने पारंपरिक चायनीज औषधोपचार करून उपचार सुरू ठेवले. मात्र यामुळे काहीही फायदा झाला नाही. अनेक प्रयत्नांनंतर, त्याने शियानमधील गॉक्सिन हॉस्पिटलमध्ये औषधोपचार करण्यासाठी गेला असता त्याला अशी एक गोष्ट समजली की त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
श्याओमाला गेल्या महिन्याभरापासून सतत शिंका येणे, नाक बंद होणे आणि नाक वाहणे याता त्रास होत होता. यासाठी त्याने अनेक प्रयत्न देखील केले. मात्र काहीच फायदा न झाल्याने तो रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून त्याला एलर्जि झाल्याचे निदान केले. यासाठी डॉक्टरांनी त्याला नाकाची एन्डोस्कोपी करायला सांगितले. यामध्ये त्याच्या नाकात सफेद गोळा असल्याचे आढळून आले. हे रिपोर्ट पाहून श्याओमाला धक्काच बसला.
डॉक्टरांनी श्याओमच्या नाकाचे ऑपरेशन करुन नाकातून तब्बल दोन सेंटीमीटरचा डाइस (फासा) काढला. त्यामुळे अनेक दशकांपासून शिओमाच्या नाकात असलेला संसर्ग दूर झाला. बराच काळ हा फासा नाकात अडकल्यामुळे झिओमाला सतत शिंका येणे, नाक बंद होणे याचा त्रास होत होता. मात्र यासगळ्याकडे त्याने दुर्लक्ष केल्यामुळे तो सतत आजारी पडत होता. दरम्यान नाकाची सर्जरी यशस्वीरित्या पार पडली.