90 च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे. ममताने अलिकडेच महाकुंभात किन्नर आखाड्यातून दीक्षा घेतली आणि महामंडलेश्वर झाली. या दरम्यान तिला एक नवीन नाव मिळाले असून किन्नर आखाड्याने तिचे नाव श्री यमाई ममता नंदगिरी असे ठेवले आहे. मात्र सन्यास घेऊन धर्माचा मार्ग अवलंबणारी ममता कधी चित्रपटसृष्टी परतणार का? असा प्रश्न प्रत्येक चाहत्याच्या मनात आहे. यावर आता स्वत: ममतानेच उत्तर दिले आहे.
ममता कुलारणीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटात पुनरागमन करण्याबाबत आपले मत व्यक्त केले. “मी पुन्हा चित्रपटात काम करण्याचा विचारही करू शकत नाही. हे माझ्यासाठी अशक्य असल्याचे तिने सांगितले. तुम्हाला जीवनात प्रत्येक गोष्टीची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या गरजा ओळखल्या पाहिजेत. पण अध्यात्म ही अशी गोष्ट आहे जी केवळ नशिबानेच मिळते. हा महादेव आणि महाकालीचा आदेश होता. हा माझ्या गुरूंचा आदेश होता. त्यानी हा दिवस माझ्यासाठी निवडला होता, असे ममताने सांगितले.
View this post on Instagram
90 च्या दशकात ममता कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्या काळात तिने सलमान खान आणि शाहरुख खानसोबत करण अर्जुनमध्ये काम केले. याशिवाय वक्त हमारा है, क्रांतिवीर, आंदोलन, बाजी आणि छुपा रुस्तम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आता मात्र महामंडलेश्वर म्हणून ओळखली जाणार आहे.