Mamta Kulkarni ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होणार

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला आहे. त्यासाठी ममता प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला पोहोचली आहे. ममता ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार असून शुक्रवारी तिने या आखाड्याची दीक्षा स्वीकारली. ममता आता ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ या नावाने ओळखळी जाणार आहे. ममतताचे साध्वीच्या वेशातील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ममता कुलकर्णीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओ ती साध्वीच्या वेशात दिसत आहेत. भगवे वस्त्र तिने घातले आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत.

ममता कुलकर्णीने 2000 साली देश सोडला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात ती मुंबईत परतली आहे. याआधी 2012 च्या कुंभमेळ्यात सहभागी व्हायला ती मायदेशी आली होती. 12 वर्षांनी हिंदुस्थानात आणि 25 वर्षांनंतर मुंबईत आल्याचे ममताने तेव्हा तिच्या पोस्टमध्ये सांगितले.

2015 मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ममताचे नाव आले होते. त्यानंतर ती देश सोडून गेली होती. दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकरणात ममता व तिचा पती विकी गोस्वामी यांची नावे आली होती. दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप झाला होता. गंभीर आरोप असूनही, ममताला अटक झाली नव्हती. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने तिला ‘क्लीन चिट’ देत तिच्याविरुद्धची तक्रार रद्द केली.