दंगलीतही शांत राहा, नाहीतर NIA येईल; मुस्लिमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी मोदी सरकारवर बरसल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. ईद निमित्त आयोजित एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी मुस्लिम समाजाशी संवाद साधला. कोलकाताच्या रेड रोडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘मुस्लिम बांधवांनी दंगलीतही शांत राहावं, नाहीतर NIA अटक करेल’, असे म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपप्रणित केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

‘कोणी दंगल घडवण्यासाठी येत असेल तर तुम्ही शांत राहा. आपण त्यांना दंगल भडकवू द्यायची नाही. आपण शांत राहिलो नाही तर, अटक करण्यासाठी ते NIA ला पाठवतील’, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. ‘मला अटक करून तुम्ही तुरुंगात डांबू शकता. हे मी जाणून आहे. पण मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है, हा शेर म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार आणि केंद्रातील तपास संस्थांवर निशाणा साधला.

‘मरणाची भीती नाही, मृत्यू मला घाबरतो’

‘मी द्वेषाचे राजकारण करत नाही. आम्हाला सीएए नकोय. देशासाटी रक्त सांडण तयार आहे. मरेन पण सीएए लागू करण्यास मंजुरी देणार नाही. मी मरणाला भीत नाही. मृत्यू मला घाबरतो. काही लोक आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. 130 कोटींच्या देशात तुम्ही किती लोकांना तुरुंगात टाकाल?’ असा सावल करत ममता बॅनर्जी यांनी आणखी एक शेर म्हटला. ‘खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या हैं. माझी रजा म्हणजे माझी इच्छा आहे. माझी इच्छा ही सर्व धर्म समभावाची आहे’, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Lok Sabha Election 2024 – ED, CBI आणि NIA च्या प्रमुखांना हटवा; TMC ची निवडणूक आयोगाकडे मागणी

‘अत्याचार सहन करणार नाही’

‘ED, CBI आणि NIA ला हाताशी धरून तुम्ही काय कराल? तुम्ही आमच्यावर जेवढा अत्याचार कराल तितका आम्ही अधिक तीव्र विरोध करू’, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला. संदेशखालीमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर अलीकडेट मेदिनीपूरमध्ये NIA पथकावरही हल्ला करण्यात आला होता. यानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘NIA चे पथक रात्री छापा टाकण्यासाठी का गेले होते?’ असा प्रश्न मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केल्याने त्यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊन राजकारण तापले आहे.