मालवण कट्टाला विजेतेपद

ऋषिकेश पवारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मालवण कट्टा संघाने बेनेट कम्युनिकेशन संघाचा 61 धावांनी पराभव करत 49 व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटाचे विजेतेपद पटकावले. मालवण कट्टा संघाने 256 धावांचा पाठलाग करणाऱ्या बेनेट कम्युनिकेशन संघाला 195 धावांवर रोखत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना ऋषिकेशने 36 धावांसह चार बळी मिळवले.