
2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या खटल्यावर सुनावणी घेणारे एनआयए कोर्टाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या नाशिक येथील बदलीला हायकोर्टाकडून तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. खटला अंतिम टप्प्यात असताना न्यायाधीश लाहोटी यांना या खटल्यावर निर्णय देता यावा यासाठी त्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसे परिपत्रक हायकोर्टाच्या रजिस्ट्रीने जारी केले आहे.
निसार अहमद यांनी या हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा यासाठी अतिरिक्त न्यायाधीश ए.के. लाहोटी यांची बदली करू नये अशी विनंती करत अॅड. शाहिद नदीम यांच्यामार्फत हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांना पत्र लिहिले होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांची शेवटच्या क्षणी बदली झाल्यास खटल्यावर परिणाम होईल. नवीन न्यायाधीशांसमोर नव्याने सुनावणी घ्यावी लागेल व त्यात पुन्हा अनेक वर्षे जातील असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.