मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी

मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या खटल्यावर विशेष एनआयए कोर्टात आज अखेरची सुनावणी झाली. अतिरिक्त न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने विशेष न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला. भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित व इतर काही जणांविरोधात आरोप ठेवण्यात आले असून 8 मे रोजी खटल्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तब्बल 17 वर्षांनी या खटल्यावर फैसला होणार असल्याने संशयित आरोपींना शिक्षा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.