मालदीव त्याच्या रमणीय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलं तरी गेल्या काही काळापासून ते अनेकांच्या काळ्यायादीत जाऊ लागलं आहे. गाझामधील संघर्षावरून त्यांनी इस्रायलींना देशात प्रवेश बंदी केली. प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने आपल्या नागरिकांना मालदीवला जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
यादरम्यान, इस्रायली दूतावासाच्या X पेजवर गोव्यापासून केरळपर्यंतच्या हिंदुस्थानच्या समुद्रकिनाऱ्यांचे फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. ते त्यांच्या नागरिकांना मालदीव सोडून त्याऐवजी हिंदुस्थानातील समुद्रकिनार्यावरील गंतव्यस्थानांकडे जाण्याचे आवाहन करत आहेत.
इस्रायलच्या दूतावासानं सोमवारी ट्विट केलं की, ‘मालदीव यापुढे इस्रायलींचे स्वागत करणार नसल्यानं, येथे काही सुंदर आणि आकर्षक हिंदुस्थानी किनाऱ्यांचे फोटो टाकले आहेत. इथे इस्रायली पर्यटकांचे स्वागत केले जाते आणि आदरातिथ्य केलं जातं’.