त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद या हिंदुस्थानच्या महिला जोडीने मंगळवारी मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. हिंदुस्थानच्या सहाव्या मानांकित जोडीने थायलंडच्या ओर्निचा जोंगसाथापोर्नपार्न व सुकिता सुवाचाई या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव करीत आगेकूच केली.
त्रिशा-गायत्री जोडीने ओार्ंनचा-सुकिता जोडीचा 30 मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत 21-10, 21-10 असा पराभव करीत अंतिम 16 मध्ये स्थान पक्के केले. पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ करणाऱया त्रिशा-गायत्री जोडीने पहिल्या गेममध्ये पहिल्या झटक्यातच 17-8 अशी मुसंडी मारली होती. त्यानंतर त्यांना हा गेम जिंकायला वेळ लागला नाही. मग दुसऱया गेममध्ये थायलंडच्या जोडीने सुरुवातीला कडवी लढत दिल्याने एकवेळ 8-8 अशी बरोबरी होती, मात्र त्यानंतर त्रिशा-गायत्री या हिंदुस्थानी जोडीने पुन्हा मुसंडी मारली अन् दुसरा गेम जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.