Photo – पिवळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायका अरोराचा किलर लूक, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. तिचे सौंदर्य वाढत्या वयानुसार आणखीनच खुलत आहे. वयाच्या 51 व्या वर्षीही मलायकाचे सौंदर्य तरुणाईला लाजवेल असेच आहे. नुकतेच मलायकाने तिचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसली होती.

या फोटोमध्ये मलायका अरोरा बीचवर असलेल्या रिसॉर्टमध्ये सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. .

मलायका अरोराने तिचे हे सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

या फोटोंमध्ये मलायका अरोराने पिवळ्या रंगाचा लांब बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये Sunsets आणि बरेच काही असं म्हटले आहे. तिच्या पाठिमागे सूर्यास्ताचे सुंदर दृश्य दिसत आहे.               

मलायकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या लूकचे खूप कौतुक करत आहेत.