बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अरबान खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूर याला डेट करू लागली. दोघांच्या वयामध्ये असलेल्या अंतरामुळे हे कपल कायम चर्चेत असायचे. मात्र 2024 मध्ये दोघांच्या नात्यात दुरावा आला.
अर्जुन कपूर नुकताच अजय देवगन याच्या सिंघम अगेन या चित्रपटामध्ये झळकला. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याने आपण सिंगल असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे मलायका अरोरा मात्र दोघांच्या नात्यावर चकार शब्दही बोलायला तयार नव्हती. मात्र आता अर्जुनच्या ‘मी सिंगल आहे’, या विधानावर पहिल्यांदाच जाहीररित्या प्रतिक्रिया दिली आहे.
‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा हिला अर्जुन कपूर याच्या विधानाबाबत विचारण्यात आले. यावेळी ती म्हणाली की, मी माझ्या खासगी आयुष्याबाबत जाहिररित्या बोलण्याचे टाळते. मी कधीही असे करणार नाही. अर्जुनने जे काही सांगितले आहे ते पूर्णपणे त्याची इच्छा आहे आणि मला त्यावर काहीही बोलायचे नाही.
गत वर्षातील आव्हानांनंतर आता नवीन वर्षात पुढे जाण्याची वेळ आली असून प्रत्येकाला पुढे जाऊ द्या आणि नवीन वर्षाचे स्वागत करू द्या.
गेल्या वर्षातील आव्हानांनंतर आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाने पुढे जावे आणि नवीन वर्षाचे स्वागत करूया, हे नवीन सुरुवातीचे संकेत आहेत, असेही मलायका म्हणाली.
View this post on Instagram
दरम्यान, अर्जुन कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मलायका अरोराचे नाव घेऊन त्याला काही प्रश्न विचारण्यात आले. यावर तो म्हणतो, मी सिंगल आहे. तुम्ही काळजी करू नका.
View this post on Instagram