Photo – काय चाल, काय अदा… ब्लॅक कपड्यातील मलायकावर नेटकरी फिदा

काळ्या रंगाचे कपडे सगळ्यांवर फार उठून दिसतात असे बोलले जाते.

अभिनेत्री मलायका अरोरा हिलाही काळा रंग आवडतो आणि तिने अनेकदा काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत.

नुकतेच तिने जियो वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन विक एक्स एफडीसीआय 2025 मध्ये काळे कपडे घालून रॅम्प वॉक केला.

मलायकाने डियाझनर नम्रता जोशीपुरा हिच्यासाठी शो स्टॉपर बनत चमचमते काळे कपडे घातले आणि रॅम्प वॉक केला.

काळ्या कपड्यातील तिचे सौंदर्य पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.