
उन्हाळ्याची खरी मजा ही कैरी बाजारात दिसल्यावर येते. बाजारात कैरी दिसताच, घरी अनेक कैरीचे पदार्थ होऊ लागतात. कैरीचे पदार्थ म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसातील बेगमी असते. याच बेगमीमधील एक मुख्य पदार्थ म्हणजे कैरीचं लोणचं. एप्रिल, मे महिन्यात आपल्याला कैरीच्या अनेक जाती बाजारात दिसू लागतात. बाजारात कैरी दिसू लागली की, घरी तोंडीलावणीसाठी अनेक पदार्थ तयार होऊ लागतात. लोणचंही त्यातलाच एक पदार्थ.. परंतु पारंपारिक पद्धतीने कैरीचे लोणचे तयार करण्यासाठी प्रचंड वेळ आणि मेहनत दोन्ही लागते. तुम्हाला वेळ नसेल तर, अगदी पाचच मिनिटांत होणारे लोणचे आज आपण बघणार आहोत.
हे लोणचे 3-4 दिवस उन्हात ठेवण्याची गरज भासणार नाही किंवा जास्त वेळ वाट पाहण्याचीही गरज भासणार नाही. चपाती, भाकरी, वरण-भात, पराठा कशासोबतही हे लोणचं तोंडीलावणीसाठी घेऊ शकाल.
कैरीचे झटपट लोणचे बनवण्याची पद्धत
सर्वात आधी कैरी स्वच्छ धुवून घ्या. एका मोठ्या भांड्यात मीठ, लाल तिखट आणि हळद घाला आणि चांगले मिसळा. आता या भांड्यात कैरीचे तुकडे, लाल तिखट आणि मोहरीचे तेल घाला आणि सर्वकाही मिसळावे. किमान दीड तास हे लोणचं उबदार जागी ठेवावे. वरुन थोडेसे मोहरीचे तेल घालावे आणि झाकणाने झाकून ठेवा.
हे लोणचे रेफ्रिजरेटरमध्ये 10 ते 15 दिवस सहज टिकू शकते.