IPL 2025 – कडेकोट सुरक्षा भेदून चाहता मैदानात घुसला, रियान परागला गोलंदाजी करता करता थांबवलं अन्…

इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना पार पडला. या लढतीमध्ये केकेआरने राजस्थानचा 8 विकेट्सने पराभव केला. राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव आहे. हा सामना क्विंटन डीकॉकच्या वादळी खेळीसह मैदानात घडलेल्या आणखी एका घटनेमुळे चर्चेत आला. कडेकोट सुरक्षा भेदून चाहता मैदानात घुसला आणि थेट राजस्थानचा कर्णधार रियान परागजवळ पोहोचला. याआधी असाच प्रकार विराट कोहलीबाबतही घडला होता. यामुळे आयपीएलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका

राजस्थान आणि कोलकातामधील सामना गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट मैदानावर रंगला. हे राजस्थानचा कर्णधार रियान परागचे घरचे मैदानात असून इथेच तो लहानपणापासून क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला खेळताना पाहण्यासाठी मैदानावर चाहत्यांनी गर्दी केली होती. याचवेळी एक चाहता कडेकोड सुरक्षा भेदून मैदानात घुसला आणि रियानजवळ पोहोचून त्याच्या पाया पडला.

नक्की काय घडलं?

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 151 धावा केल्या. यात रियान पराग याने 25 धावांचे योगदान दिले. फलंदाजीनंतर त्याने गोलंदाजीमध्ये हात आजमावला. पराग कोलकाताच्या डावातील 12 वे षटक टाकत होता. तो पहिला चेंडू टाकण्यासाठी धावू लागताच एक चाहता मैदानात घुसला आणि थेट रियानकडे पळत आला. त्याने रियानला गोलंदाजी करताना थांबवले, त्याच्या पायाला स्पर्श केला आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि चाहत्याला बाहेर नेले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

IPL 2025 – कोलकाताच रॉयल! डिकॉकची सुपर नॉक, राजस्थानचे सारेच अयशस्वी