Mumbai News – मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, विरार-चर्चगेट AC ट्रेनला जागच्या जागी ब्रेक

वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला आहे. विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडली आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारल्याने हा अनर्थ टळला आहे. या वाकलेल्या रेल्वे रुळाचे व्हिज्युअल समोर आले आहेत.

या घटनेनंतर अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरुन पायी नालासोपारा स्थानक गाठले. ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता आणि त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत कळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला.

या घटनेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशी सुखरुप राहिले. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेत ट्रॅक वाकण्यामागचे कारण तपासत आहेत.